केळीचे फूल स्वच्छ करून बारीक चिरा. ते ५–७ मिनिटे हलके उकळून घ्या, नंतर पाणी पूर्णपणे काढून थंड होऊ द्या.
Picture Credit: Pinterest
भिजवलेली चणा डाळ गाळून त्यात हिरवी मिरची, आले, लसूण, जिरे, बडीशेप आणि हिंग घालून जाडसर वाटून घ्या.
Picture Credit: Pinterest
या मिश्रणात उकडलेले केळीचे फूल, कांदा, कोथिंबीर आणि मीठ घालून सर्व साहित्य एकत्र चांगले मिसळा.
Picture Credit: Pinterest
मिश्रणाचे लहान लहान गोळे करून हाताने हलकेच दाबून वड्यांचा आकार द्या.
Picture Credit: Pinterest
कढईत तेल मध्यम आचेवर गरम करा. तेल योग्य तापल्यावर तयार वडे सावधपणे सोडा.
Picture Credit: Pinterest
वडे दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
Picture Credit: Pinterest
तयार वडे टिश्यू पेपरवर काढा आणि गरमागरम नारळाची चटणी, टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest