हिंदू धर्मानुसार श्रावण महिन्याची सुरुवात 25 जुलैपासून होत आहे यावेळी भक्त मनोभावे महादेवाची पूजा करतात.
असे म्हटले जाते की, श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा केल्याने भक्ताची अडकलेली कामे पूर्ण होतात. घरात सुख समृद्धी येते.
दूध आणि तांदूळाचे काही उपाय केल्याने तुम्हाला त्याचा जीवनात फायदा होऊ शकतो. कोणते आहेत ते उपाय जाणून घ्या
सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन दुधाने अभिषेक करा. यानंतर पाण्याने अभिषेक करा नंतर तांदूळ त्यावर अर्पण करा.
यादरम्यान ओम ऐ क्लीं सोमाय नमः चंद्राच्या मंत्रांचा जप करा. तसेच ओम श्रां श्रीं श्रौं सः चन्द्रमसे नमः या मंत्रांचा जप करा
दुधामध्ये काळे तीळ आणि तांदूळ एकत्र करून अभिषेक केल्याने महादेवांचा आशीर्वाद मिळतो आणि तुमची प्रगती होऊ शकते.
सोमवारी दूध आणि तांदळाची खीर बनवून गरिबांना दान केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात.
घरामध्ये आर्थिक समस्या असल्यास श्रावणात मंदिरात जाऊन महादेवांना दूध आणि तांदूळ अर्पण करा.