www.navarashtra.com

Published Dec 26,  2024

By Divesh Chavan

अर्जुनाचे 'हे' गुण करा अंगीकृत; यश मिळवणे होईल सोपे

Pic Credit -  istock

अर्जुनाने कर्माचे महत्व ओळखले. अर्जुनाप्रमाणे आपल्या जीवनातही कर्तव्यावर लक्ष केंद्रित करा.  

कर्मावर विश्वास

धनुर्विद्येच्या साधनेत कठोर मेहनत घेणारा अर्जुन शिस्त पाळण्यात चोख होता. शिस्तीचे पालन करून यश मिळवणे सोपे होते.  

शिस्तबद्धता

प्रत्येकाला मार्गदर्शनाची गरज असते. अर्जुनाला नेहमी श्रीकृष्णाचे मार्गदर्शन लाभले. योग्य मार्गदर्शन जीवनातील अडचणींवर मात करण्यास मदत करते.   

मार्गदर्शन स्वीकारण्याची वृत्ती

अर्जुनाने जेव्हा जयद्रथाचा वध करण्याची प्रतिज्ञा घेतली, तेव्हा ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न केले. एखादी गोष्ट साध्य करायची असेल, तर दृढ निश्चय महत्त्वाचा आहे.  

संकल्पबद्धता

आदरभावना असणे महत्वाचे आहे. अर्जुनाने गुरु द्रोण आणि श्रीकृष्णाप्रती आदरभावना ठेवली. 

आदरभावना

अर्जुनाने अज्ञातवासातही संकटांचा सामना केला. त्याच्या धैर्याने तो कोणत्याही कठीण परिस्थितीतही खंबीर राहिला. कठीण प्रसंगी खचून न जाता सामर्थ्याने वागा.  

संकटांवर मात करण्याची क्षमता

धनुष्याने माशाच्या फक्त डोळ्यावर बाण मारण्यासाठी अर्जुनाने केवळ लक्ष्यावर लक्ष केंद्रित केले. जीवनात यशासाठी एकाग्रता गरजेची आहे.  

एकाग्रता

अर्जुन नेहमी सत्य आणि धर्माच्या बाजूने होता. आपणही सत्य आणि न्यायासाठी उभे राहायला शिकले पाहिजे.  

न्यायासाठी लढण्याची जिद्द