Written By: Prajakta Pradhan
Source: Pinterest
अक्षय्य तृतीया हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी पूजेसोबतच सोन-चांदी खरेदी केले जाते.
असे मानले जाते की, अक्षय्य तृतीयेच्या विशेष प्रसंगी, काही ठिकाणी दिवे लावल्याने लक्ष्मी आणि विष्णूचे आशीर्वाद मिळतात. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या जागा
अक्षय्य तृतीयेला पूजेच्या ठिकाणी लक्ष्मी विष्णूच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावा. दिव्यामध्ये लवंग आणि कापूर टाका. याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.
तुळशीला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. अक्षय्य तृतीयेला तुळशीच्या रोपाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. असे केल्याने घरात सुख समृद्धी येते.
अक्षय्य तृतीयेच्या संध्याकाळी घराच्या मुख्यदाराजवळ तुपाचा दिवा लावा. एक दिवा उजवीकडे आणि एक डावीकडे ठेवा. एक दिवा उजवीकडे आणि एक डावीकडे ठेवा, यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करेल.
स्वयंपाकघराला अन्नपूर्णाचे स्थान म्हणतात. अक्षय्य तृतीयेला स्वयंपाकघरात तुपाचा दिवा लावा आणि अन्नुपूर्णा देवीला खिरीचा नैवेद्य दाखवा
अक्षय्य तृतीयेला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा. दिव्यात केसर मिसळून ओम श्री ही श्री महालक्ष्मैय नमः या लक्ष्मी मंत्राचा जप करा.