Published Nov 11, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
रोज खाल्ल्या जाणाऱ्या ‘या’ भाज्या मूळ भारतातील नाहीच
भाज्यांमध्ये विटामिन्स, मिनरल्स, फायबर आणि अनेक पोषक तत्व आढळतात. भाजी हा आपल्या आहारातील अविभाज्य घटक आहे
पण तुम्हाला माहीत आहे का? रोज खाल्ल्या जाणाऱ्या काही भाज्या या मूळच्या भारतातील नाहीतच. फेडरेशन ऑफ सीड इंडस्ट्री ऑफ इंडियाने माहिती दिली आहे
बटाट्याची भाजी ही तर सर्वांची आवडती आहे. पण ही भाजी भारतीय नसून दक्षिण अमेरिकेतील आहे. पोर्तुगालच्या व्यापारांनी 16 व्या शतकात भारतात आणली
.
टॉमेटोची व्युत्पत्ती ही साऊथ आणि सेंट्रल अमेरिकेतील असल्याचे मानले जाते. ही भाजीदेखील 1600 च्या दशकात पोर्तुगाल भारतात घेऊन आले
.
कॉलीफ्लॉवरची ही भाजी भारतीय नसून सायप्रस या इटलीतील भूमध्यसागरीय क्षेत्रातील आहे. पण आता भारताच्या किचनमधील अविभाज्य भाग आहे
सिमला मिरची ही शिमलातील नाही तर दक्षिण अमेरिकेतील महाद्वीपमधील आहे. 3000 वर्षांपूर्वी सर्वात पहिल्यांदा या भाजीची शेती करण्यात आली
भारतातील सर्वात आवडती डिश म्हणजे गाजर हलवा. पण गाजर ही भारतीय भाजी नसून सेंट्रल एशियाच्या सिल्क रोड ट्रेडकडून भारतात आली आहे