इडली ढोकळा खावून कंटाळा आला आहे का, हे पदार्थ बनवा

Life style

06 December, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

वाफवून घेणे आरोग्यदायी आहे. इडली आणि ढोकळा हे भारतीय पाककृतींमधील प्रसिद्ध वाफवलेले स्नॅक्स आहेत, याशिवाय इतरही अनेक पदार्थ आहेत.

वाफवलेले स्नॅक्स

अळूची पाने मसाले आणि बेसनाने गुंडाळून वाफवता येतात. बऱ्याच जणांना हे पदार्थ खायला खूप आवडतात

अळूवडी

मोदक

गूळ आणि नारळ घालून बनवलेला तांदळाच्या पिठापासून बनवलेला महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध गोड पदार्थ.

पुट्टू

केरळमधील नाश्त्याचा प्रकार. बांबूच्या काठ्यांवर तांदळाचे पीठ आणि केळी यांचे मिश्रण शिजवले जाते.

मोमोज

सिस्कीमचा प्रसिद्ध नाश्ता. कणकेचे गोळे भाज्या किंवा पनीर किंवा चिकन भरून शिजवले जातात.

खांडवी

बेसन आणि दह्यापासून बनवलेला आणि वाफवलेला एक गुजराती पदार्थ.

वाफवलेल्या भाज्याचा नाश्ता

ताज्या भाज्या वाफवून घेतल्यास चविष्ट नाश्ता बनवता येतो.

भापा पिठा

भापा पिठा हा बंगालमधील एक स्वादिष्ट पदार्थ आहे. तांदळाच पीठ आणि नारळाच्या मिश्रणाने हे बनवले जाते