साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा हे उपवासातील लोकप्रिय पदार्थ आहेत. ते पोटभर आणि ऊर्जा देणारे असतात.
Picture Credit: Pinterest
वरईची खिचडी, भगर, राजगिरा थालीपीठ किंवा राजगिरा पुरी हे पौष्टिक पर्याय असून उपवासासाठी योग्य मानले जातात.
Picture Credit: Pinterest
रताळ्याचा किस, उपवासाची बटाट्याची उसळ किंवा उकडलेले बटाटे हे सहज पचणारे आणि शरीराला आवश्यक ऊर्जा देणारे पदार्थ आहेत.
Picture Credit: Pinterest
दूध, ताक, दही, लस्सी किंवा मखाना खीर यांसारखे पदार्थ शरीराला थंडावा देतात आणि पोषणही मिळवून देतात.
Picture Credit: Pinterest
केळी, सफरचंद, डाळिंब, पपई तसेच बदाम, काजू आणि अक्रोड यांचा आहारात समावेश केल्यास दिवसभर उत्साह टिकून राहतो.
Picture Credit: Pinterest
उपवासाच्या दिवशी शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून पाणी, नारळपाणी किंवा लिंबूपाणी यांचे योग्य प्रमाणात सेवन करा.
Picture Credit: Pinterest
उपवासाचा उद्देश अन्नत्याग नसून मन आणि शरीर शुद्ध ठेवणे आहे. त्यामुळे हलका, आणि मर्यादित आहार घेऊन भगवान विठ्ठलाच्या भक्तीत मन रमवा.
Picture Credit: Pinterest