आषाढी आणि कार्तिकी एकादशीला हिंदू धर्मात मोठं महत्व आहे.
मात्र तुम्हाला उपवासाचा खरा अर्थ माहितेय का ?
उपवास म्हणजे शरीर आणि मन शांत ठेवून देवाची केलेली आराधना.
खरंतर उपवासाला साबुदाणा आणि बटाट्याचे वेफर्स खाल्याने पित्त वाढतं.
त्य़ामुळे शरीरातील तामसीवृत्ती जास्त वाढते.
म्हणूनच उपवास म्हणजे फलहार करणं आणि देवाचं नामस्मरण करणं होय.
उपवासाच्या दिवशी शरीराला थंडावा देईल अशा फळांचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.