विटेवर उभा असलेला देव म्हणजे विठ्ठल.
हा पंढरीचा राजा पालनकर्ता असून त्याचे डोळे बंद का ?
यामागे काही आख्यायिका देखील सांगितली जाते.
विठ्ठलाच्या डोळ्यांचे बंद असणे हे अंतर्मुख असणं आहे.
बाहेरच्या जगाचा विसर पडून "स्वतःच्या आत्म्यात डोकावणं" असा याचा अर्थ होतो.
विठ्ठल हे शांती, समत्व आणि ध्यान यांचं मूर्त स्वरूप आहेत.
विठोबाचे डोळे बंद असणे हे केवळ मूर्तीची रचना नाही, तर त्यामागे एक गूढ आणि आध्यात्मिक संदेश आहे
"देव बाहेर शोधू नका, तो तुमच्या अंतरात्म्यात आहे असा अर्थ होतो.