www.navarashtra.com

Published On 27 Feb 2025 By Divesh Chavan

'या' मंदिरात पूजा करण्यासाठी स्वतः अश्वत्थामा येतो; विज्ञानदेखील आहे हैराण 

Pic Credit -   Pinterest

कानपूरपासून सुमारे ४० किमी अंतरावर शिवराजपूर येथे असलेले खेरेश्वर मंदिर महाभारत कालापासून अस्तित्वात आहे.

महाभारतकालीन मंदिर 

असे मानले जाते की दररोज सकाळी मंदिराचे दरवाजे उघडण्यापूर्वी शिवलिंगावर पुष्प व पूजेचे साहित्य अर्पण केलेले असते, आणि ही पूजा अश्वत्थामा स्वतः करतो.

अश्वत्थामाची पहिली पूजा 

अनेक वेळा येथे कॅमेरे लावून तपासण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु अजूनही या पूजेचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही.

अद्भुत रहस्य 

महाभारतातील युद्धात पांडव पुत्रांचा वध केल्याने श्रीकृष्णाने अश्वत्थामाला अजर-अमर होण्याचा आणि पृथ्वीवर फिरत राहण्याचा शाप दिला.

अश्वत्थामावर श्रीकृष्णाचा श्राप

असे मानले जाते की कौरव-पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांनी या मंदिरात तपस्या केली होती आणि मंदिराचा इतिहास द्वापार युगाशी संबंधित आहे.

द्वापारयुगाशी संबंध 

विज्ञानाने या घटनेचे स्पष्टीकरण दिले नसले तरी लोकांची श्रद्धा दिवसेंदिवस वाढत आहे आणि लाखो भक्त येथे दर्शनासाठी येतात.

श्रद्धेचे महत्त्व 

या दिवशी येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण होण्याचा विश्वास ठेवतात.

महाशिवरात्रीचा विशेष महिमा