Published Jan 19, 2025
By Prajakta Pradhan
Pic Credit - pinterest.
हिंदू धर्मात दिवा शुभतेचे प्रतीक मानले जाते. पूजेच्या वेळी दिवा लावला जातो. हा दिवा मुख्यतः पूजेच्या वेळी लावला जातो आणि तो घराच्या मुख्य दारावरही ठेवला जातो.
दिवा लावल्याने घरात सुख-समृद्धी येते. कुटुंबात आपत्ती येत नाही आणि सर्व कामे पूर्ण होतात
दिव्याशी संबंधित काही नियम सांगितले गेले आहे. रात्री दिवा का लावू नये याबद्द्ल सविस्तर जाणून घेऊया
सूर्यास्तानंतर म्हणजेच रात्री देवी देवता विश्रांती घेतात यामुळे रात्री दिवा लावल्याने त्यांच्या विश्रांतीमध्ये बाधा येते असे म्हटले जाते.
रात्री दिवा लावल्याने व्यक्तीला फायदा होत नाही. देवी-देवतांना रागही येऊ शकतो.
दिवा नेहमी अशा वेळी लावावा जेव्हा देव जागे असतात. सूर्योदय आणि सूर्यास्त दरम्यान आपल्या घरात किंवा देव्हाऱ्यात दिवा लावावा.
तुटलेला दिवा कधीही लावू नये असे मानले जाते. असे मानले जाते की तुटलेला दिवा लावल्याने व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.