Published Nov 19, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
आयुर्वेदिक पद्धतीने प्याल दूध तर रहाल हेल्दी
दुधात अनेक पोषक तत्व आढळतात, तर गाईचं दूध हे आरोग्यदायी मानले जाते. दूध पिताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या
आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. वरालक्ष्मी यांच्यानुसार आयुर्वेदानुसार दूध पिण्याचे काही नियम आहेत, त्यामुळे काही गोष्टींची काळजी घ्यावी
दूध उकळून आणि कोमट वा थंड होईपर्यंत ठेवावे आणि नंतर प्यावे. यामुळे पित्त होत नाही आणि शरीराला अधिक फायदा मिळतो
.
दुधात बेदाणे, बदाम, ब्राऊन शुगर, साखर, लसूण, तूप, सुंठ पावडर, खजूरसारखे पदार्थ मिक्स करून पिऊ शकता यामुळे आरोग्य निरोगी राहते
.
रिकाम्यापोटी, दुपारी अथवा रात्री झोपण्यापूर्वी दुधाचे सेवन करणे उत्तम ठरते. यामुळे थकवा, अशक्तपणा येत नाही
दुधात अनेक पोषक तत्व असल्याने ब्लिडिंग डिसऑर्डरची समस्या असलेल्यांनी याचे सेवन करणे फायदेशीर ठरेल
एनिमिया अर्थात शरीरातील रक्ताची कमतरता असल्यास दुधाचे नियमित सेवन करावे, यामुळे आरोग्याला फायदा होतो
रात्री झोपताना दुधाचे सेवन केल्याने तुमचा मेंदू शांत राहतो आणि थकवा दूर होऊन चांगली झोप लागते
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही