Written By: Mayur Navle
Source: Yandex
लहान मुलं ही खूप निरागस असतात म्हणूनच तर ती देवाघरची फुलं असतात.
पण हीच निरागस मुलं आपल्या पालकांकडून काही वाईट सवयी देखील शिकू शकतात. चला याबद्दल जाणून घेऊया.
पालक जर वारंवार खोटं बोलत असतील (उदा. फोनवर “घरी नाही” सांगणे), तर मुलं ही सवय सहज आत्मसात करतात.
पालक सतत मोबाईलमध्ये गुंतलेले असतील तर मुलंही तशीच सवय लावून घेतात.
घरी सतत दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणे, टोमणे मारणे, टीका करणे ही सवय मुलांवर खोल परिणाम करते.
छोट्या गोष्टींवर पालक जर आरडाओरड करत असतील तर मुलंही तसंच वागायला लागतात.
वेळेचं भान न ठेवणं, असंवेदनशील वागणं यामुळे मुलांमधील शिस्त कमी होते.