Published Dec 14, 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
अनेक जण बदामाचे तेल केसांसाठी वापरत असतात. पण हे तेल चेहाऱ्यासाठी सुद्धा लाभदायक ठरणार आहे. चला याचे फायदे जाणून घेऊया.
बदामाचे तेल मॉइश्चरायझर म्हणून काम करते. कोरडी आणि निर्जीव त्वचेला पोषण देऊन हे तेल मऊ व कोमल बनवते.
नियमितपणे डोळ्याखाली बदामाचे तेल लावल्याने डार्क सर्कल्स कमी होतात.
बदामाचे तेल अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने सुरकुत्या व वयामुळे होणाऱ्या त्वचेच्या लक्षणांना कमी करते.
बदामाचे तेल लावल्याने त्वचेचे नैसर्गिक चमक अधिक वाढते.
बदामाचे तेल त्वचेतील मऊपणा टिकवून ठेवते आणि ती गुळगुळीत व तजेलदार बनवते.
.
बदामाच्या तेलात असलेले दाहक विरोधी (anti-inflammatory) गुणधर्म पुरळ आणि त्वचाविकार कमी करते.
.
त्वचेला कोणतेही तेल वापरण्यापूर्वी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या, विशेषतः संवेदनशील किंवा तेलकट त्वचेसाठी.
.