Published Jan 18, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होत असते. पण अनेक जण काळा चहा सुद्धा पिताना दिसतात.
काळा चहा जरी चवीला इतर चहाच्या तुलनेत बरा असला तरी याचे फायदे खूप आहे.
काळा चहा नियमित प्यायल्याने रक्ताभिसरण सुधारते व कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रित राहते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
काळा चहा पचनसंस्थेला चालना देतो व अपचन किंवा गॅस सारख्या समस्या कमी करण्यास मदत करते.
काळ्या चहामध्ये असलेल्या ल-थिअनाइन नावाच्या घटकामुळे मन शांत राहते व तणाव कमी होतो.
काळा चहा पिण्यामुळे metabolism सुधारते व वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
काळ्या चहातील काही घटकांमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता सुधारते व संसर्गांशी लढण्याची ताकद वाढते.
नियमित काळा चहा पिण्याने रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहण्यास मदत होते, विशेषतः मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर.