Published Oct 15, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
काकडीची सालं घालवतील थकवा, दिसाल टवटवीत
थंडगार काकडी खायला सर्वांनाच आवडते. पण बरेचदा काकडी सालं काढून खाल्ली जाते. काकडीच्या सालांचा उपयोग जाणून घेऊ
थंडगार काकडीची सालं ही आरोग्यावर्धक ठरतात आणि याचा कसा आरोग्यासाठी उपयोग होतो पाहूया
रिकाम्या पोटी काकडी खाल्ल्याने त्याचा अधिक फायदा मिळतो असे तज्ज्ञ सांगतात
.
काकडी सालासकट खाल्ल्याने तुमचे वय हे अधिक काळ तरूण राहते आणि तुमच्या वयाचा अंदाजही लावता येत नाही
.
प्रदूषण आणि सतत स्क्रिनवर काम केल्याने डोळे थकतात अशावेळी काकडीची सालं डोळ्यांवर ठेवल्याने थकवा दूर होतो
काकडी शरीरातील पाण्याची कमतरता दूर करते आणि त्याच्या सालांमध्ये विटामिन सी, ए आणि के भरपूर प्रमाणात आढळते
कमकुवत हाडांसाठी रिकाम्या पोटी सालांसकट काकडी खाणे उत्तम ठरू शकते
काकडी सालासकट किसून तुम्ही डोळ्यांच्या खाली लावली तर डोळ्यांखालील काळी वर्तुळं दूर होण्यास मदत होते आणि त्वचाही चमकदार होते
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही