Published Nov 22, 2024
By Prajakta Pradhan
Pic Credit - iStock
हिवाळ्यात रोज गूळ खाण्याचे हे जबरदस्त फायदे
हिवाळ्यात गूळ खाणे खूप फायदेशीर मानले जाते. देशी गूळ उसापासून तयार केला जातो आणि साखरेपेक्षा जास्त फायदेशीर मानला जातो.
गुळामध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे अनेक पोषक घटक असतात, जे हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकतात.
गूळ शरीराला आतून गरम करतो, ज्यामुळे हिवाळ्यात थंडीपासून आराम मिळतो. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
.
गुळाचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात, कारण गुळामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरससारखे खनिजे चांगल्या प्रमाणात आढळतात.
.
सांधेदुखी आणि गुडघेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी गूळ जरूर खावा. हिवाळ्यात शरीरातील सूज कमी करण्याचे काम करते.
सूज कमी होणे
गुळामध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स देखील असतात जे शरीराला घातक मुक्त रॅडिकल्सपासून वाचवतात आणि शरीराला अनेक रोगांशी लढण्यास सक्षम बनवतात.