Published Nov 07, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
अंजीर मधात बुडवून खाल्ल्याने काय होते?
अंजीरमध्ये लोह, फायबर, कॉपर, कॅल्शियम, विटामिन असून मधात अँटीबॅक्टेरियल, अँटीऑक्सिडंट, अँटिसेप्टिक गुण आढळतात
अंजीरमधील फायबरमुळे आणि मधात बुडवून खाल्ल्याने अपचन आणि बद्धकोष्ठेतेच्या आजारातून सुटका मिळते. पचनक्रिया चांगली राहते
मधात अंजीर बुडवून ठेऊन खाल्ल्यास हाडांना मजबूती मिळण्यास मदत होते. तसंच सांधेदुखी आणि हाडांशी संबंधित त्रासातून सुटका मिळते
.
मधातील अँटीबॅक्टेरियल गुणामुळे अंजीर मध हे कॉम्बिनेशन त्वचेसाठी फायदेशीर ठरते. यामुळे डाग मुरूमांच्या समस्या सुटतात
.
उष्णतेने येणारे तोंड, घशातील खवखव, संक्रमण दूर करण्यासाठी मधात भिजवलेले अंजीर खाणे अधिक फायदेशीर ठरते
मधातील अंजीर खाल्ल्याने पोट अधिक काळ भरलेले राहते आणि ओव्हरइटिंगपासून तुम्ही दूर राहते ज्यामुळे वजन कमी करण्यास फायदा होतो
अंजीर आणि मधात असे अनेक पोषक तत्व आहेत, जे तणाव आणि चिंता दूर करण्यास मदत करतात. मेंदू शांत राहतो
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही