Published Nov 01, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
मोहरीच्या तेलाने पायचे मालिश केल्याने काय फायदे मिळतात
मोहरीच्या तेलाने पायाला मालिश करण्याचे अनेक फायदे आहेत, अनेक आजार दूर करण्यास याचा फायदा मिळतो
मोहरीच्या तेलात मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड, ओमेगा ३ फॅटी अॅसिड, अँटीइन्फ्लेमेटरी गुण आढळतात
पायावर मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने मांसपेशी मजबूत होतात तसंच त्वचेसंबंधित समस्या दूर होतात
.
तुम्हाला अनिद्रेची समस्या असेल तर पायावर मोहरीच्या तेलाने मालिश करून झोपा. 5-10 मिनिट्स मालिश केल्याने उत्तम झोप येते
.
पायावर मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि नसांचे दुखणेही बंद होते
चिंता आणि तणावाचा सामना करणाऱ्या व्यक्तींनी नियमित मोहरीच्या तेलाने पायाचे मालिश करावे. यामुळे तणाव कमी होतो
पायाची त्वचा कोरडी पडली असेल तर मोहरीच्या तेलाने मालिश केल्यास त्वचा मुलायम राहते
पायाच्या तळव्यावर अनेक बिंदू असून शरीराला एकत्रित जोडण्याचे काम करतात. मालिश केल्याने पचनक्रिया चांगली होते
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही