Published Jan 31, 2025
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
बेदाणे आणि मधाचे सेवन करणे किती फायदेशीर ठरते याबाबत डाएटिशियन गरिमा गोएल यांनी सांगितले आहे
बेदाण्यात लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, विटामिन बी६ आणि कॉपर असून मधात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुण आढळतात
मधामध्ये बेदाणे अर्धा तास भिजवून ठेवावे आणि नंतर खावे. काचेच्या भांड्यात स्टोअर करावे
रोज सकाळी उपाशीपोटी मध-बेदाणे खावे. यानंतर १ तास काहीही खाऊही नये जेणेकरून पोषक तत्व मिळतील
मध आणि बेदाण्याचे नियमित सेवन इम्युनिटी वाढविण्यास मदत करते. बदलणाऱ्या वातावरणात इन्फेक्शन, फ्लू आणि आजारांपासून वाचवते
पुरुषांसाठी हे मिश्रण खास असून स्पर्म काऊंट वाढविण्यास मदत मिळते. तसंच प्रजनन क्षमता वाढते
पुरुषांची लैंगिक शक्ती आणि इच्छा वाढण्यास बेदाणे आणि मधाच्या खाण्याने मदत मिळते. यातील कार्बोहायड्रेस आणि ग्लुकोज शरीराला शक्ती देतात
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही