Published July 26, 2024
By Dipali Naphade
शंकराला समर्पित करण्यात आलेल्या या जागांबाबत जाणून घेऊया
मुंबईच्या वाळकेश्वर भागात असणारे हे मंदिर श्रावणात भाविकांनी भरलेले असते. अत्यंत पवित्र असा हा अनुभव आहे
.
काशी विश्वनाथ मंदिर भारतातील सर्वात प्रसिद्ध शिवमंदिरांपैकी एक असून गंगा नदीजवळ स्थित आहे
गंगा नदीचा उगम असणारे हे क्षेत्र अत्यंत प्राचीन असून श्रावण महिन्यात इथे दर्शन घेतल्याने पवित्र वाटते
महाकालेश्वर ज्योर्तिलिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असून सध्या या ठिकाणी अनेक भाविक जातात
अंबरनाथ येथील शिव मंदिर हे 11 व्या शतकातील ऐतिहासिक हिंदू मंदिर आहे. महाशिवरात्री आणि श्रावणात प्रचंड गर्दी असते
गोदावरीच्या प्रार्थनेनुसार भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी इथे राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्र्यंबकेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले
भीमाशंकर मंदिर भोरगिरी गाव खेडपासून 50 किमी अंतरावर आहे. हे पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतावर वसलेले आहे