www.navarashtra.com

Published  Oct 04, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

दूध सकाळी की रात्री, कधी प्यावे मिळेल फायदा

आरोग्य निरोगी राहण्यासाठी रोज 1 ग्लास दूध पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मात्र दूध पिण्याची योग्य वेळ नक्की कोणती?

दूध

दुधातून कॅल्शियमसह अनेक पोषक तत्व मिळतात. रोज एक ग्लास दूध पिण्याची सवय असेल तर म्हातारपणापर्यंत तुम्ही निरोगी रहाल

निरोगी

हॉर्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थनुसार गाईच्या दुधात 87% पाणी आणि बाकी 37% पोषक तत्व आढळतात

गाईचे दूध

.

दुधात 13% प्रोटीनशिवाय फॅट्स, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, विटामिन्स आणि अनेक पोषक मिनरल्स आढळतात

पोषक तत्व

.

वयस्कर माणसांना रोज 226 ग्रॅम अर्थात 1 कप दूध रोज पिण्याचा सल्ला देण्यात येतो, यामुळे निरोगी राहू शकतो

किती प्यावे

दूध कोणत्याही वेळी पिण्याने फायदाच होतो मात्र रात्री झोपण्यापूर्वी दूध पिण्याने अधिक फायदा मिळतो

फायदा

झोपण्यापूर्वी दूध पिण्यामुळे चांगली झोप लागते कारण दुधात मेलाटोनिन हार्मोन असून झोपेसाठी योग्य ठरते

झोप

सकाळी दूध पिण्याने लवकर भूक लागत नाही. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी सकाळी दूध प्यावे

भूक

प्रत्येकाला दूध पचते असे नाही. काही व्यक्तींना यामुळे ब्लोटिंग अथवा गॅसचा त्रास होऊ शकतो

त्रास

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप