www.navarashtra.com

Published Feb 07, 2025

By Dipali Naphade

Weight Loss साठी ब्लॅक की ग्रीन टी कोणते उत्तम

Pic Credit -   iStock

ब्लॅक टी असो वा ग्रीन टी दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात असे अनेक अभ्यासात सिद्ध झालंय. कोणता अधिक उत्तम आहे जाणून घ्या

ब्लॅक वा ग्रीन टी

आरोग्य हेल्थ सेंटरच्या क्लिनिकल डाएटिशियन डॉ. व्ही. डी. त्रिपाठी यांनी ब्लॅक की ग्रीन टी कोणता उत्तम आहे याबाबत माहिती दिली आहे

तज्ज्ञ

तज्ज्ञांनुसार वेट लॉससाठी ब्लॅक टी आणि ग्रीन टी दोन्ही आपल्या डाएटमध्ये समाविष्ट करू शकता. या दोन्हीचे वेगवेगळे फायदे आहेत

कोणता चहा?

हे दोन्ही चहा कॅमलिया सायन्सेसिस नावाच्या झाडाच्या पानांपासून तयार होतात, ज्याची पानं हिरवी असतात. ब्लॅक टी पानं सुकवून प्रोसेस करून तयार होतो

कसा होतो

ग्रीन टी मध्ये कॅटेचिन शरीरातील अतिरिक्त चरबी विरघण्यास मदत करते. तसंच तुमची त्वचा चमकदार बनवते. फोलेट, फ्लेवोनॉईड, विटामिन बी आणि मॅग्नेशियम हे गुण आढळतात

ग्रीन टी फायदे

पॉलिफेनोल नावाचे अँटीऑक्सिडंट्स गुणांमुळे ब्लॅक टी च्या सेवनाने मेटाबॉलिज्म बुस्ट होते. पचनक्रिया चांगली ठेऊन वजन कमी करते

ब्लॅक टी फायदे

ब्लॅक टी असो वा ग्रीन टी दोन्हीचे सेवन हे प्रमाणात करावे. त्यातही ब्लॅक टी कारण त्यात कॅफीनचे प्रमाण अधिक असते

काळजी

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप