EV कार ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त अशी इलेक्ट्रिक कार लवकरच येणार आहे.
Img Source: Blink Mobility
खास बाब म्हणजे ही कार ३ मिनिटांत फुल चार्ज होणार असून तिची किंमतही खूप कमी असणार आहे.
ब्लिंक मोबिलिटी नावाच्या कंपनीने बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञानावर आधारित एक नवीन इलेक्ट्रिक कार विकसित केली.
कारची बॅटरी कायमस्वरुपी बसवलेली नसते, त्याऐवजी गरज पडल्यास ती काढून तिच्या जागी एक नवीन चार्ज केलेली बॅटरी बसवता येते.
ही बॅटरी ३ मिनिटांपेक्षा कमी वेळात पूर्णपणे चार्ज होते आणि २५० किलोमीटरची रेंज देते.
दररोज लांबचा प्रवास करतात किंवा ज्यांच्याकडे घरी चार्जिंगची सोय नाही, त्यांच्यासाठी ही गाडी फायदेशीर ठरु शकते.
या कारची रचना शहरी वापराच्या दृष्टीने केली आहे. तिच्या लहान आकारामुळे गर्दीच्या ठिकाणी चालवणे सोपे होईल.
कंपनीचा दावा आहे की, बॅटरी स्वॅपिंग मॉडेलचा अवलंब केल्याने कार खरेदी करण्याचा आणि चालवण्याचा खर्चही कमी होऊ शकतो.