Published Nov 02, 2024
By Chetan Bodke
Pic Credit - Instagram
वयाच्या पन्नाशीतही तरुणांना लाजवणारे करिश्मा कपूरचं सौंदर्य; 'लोलो च्या फोटोंवरून नजर हटेना
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आज बॉलिवूडपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
करिश्माने इन्स्टाग्रामवर दिवाळी स्पेशल फोटोशूट केले असून वयाच्या ५० व्या वर्षीही ती चाहत्यांना फॅशन गोल्स देते.
दिवाळी स्पेशल फोटोशूटमध्ये करिश्मा खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते जोरदार कौतुक करीत आहेत.
.
'जलते दिए' असं कॅप्शन देत अभिनेत्रीने फोटोशूट शेअर केले आहे.
.
रेड कलरचा घागरा वेअर करून करिश्माने कॅमेऱ्यासमोर हटके अंदाजात फोटोशूट केला.
करिश्माचा रॉयल अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असून तिच्या फॅशनचे चाहते कौतुक करीत आहेत.
सोशल मीडियावर करिश्माच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. तिच्या फॅशन सेन्सची देखील चर्चा रंगलेली असते.
करिश्माच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.