नवीन बाईकची योग्य काळजी सुरुवातीपासून घेतली, तर इंजिनची कार्यक्षमता आणि टिकाऊपणा दोन्ही वाढू शकतात.
Picture Credit: Pinterest
पहिल्या 1,000 किमीमध्ये इंजिनमधील विविध भाग एकमेकांशी व्यवस्थित जुळवून घेतात. त्यामुळे या काळात बाईक संयमाने चालवणे महत्त्वाचे असते.
Picture Credit: Pinterest
सुरुवातीच्या 1,000 किमीपर्यंत कंपनीने सुचवलेली RPM किंवा वेगाची मर्यादा पाळा. सतत जास्त वेगाने चालवणे टाळा.
Picture Credit: Pinterest
बाईक दीर्घकाळ एकाच वेगात चालवण्याऐवजी अधूनमधून गती आणि गिअर बदला. यामुळे इंजिनवर संतुलित ताण पडतो.
Picture Credit: Pinterest
फुल थ्रॉटल देणे, जोरात रेस करणे किंवा अचानक हार्ड ब्रेक लावणे टाळा. सुरुवातीच्या काळात स्मूथ रायडिंग अधिक योग्य ठरते.
Picture Credit: Pinterest
बाईक सुरू केल्यानंतर काही सेकंद इंजिन स्थिर होऊ द्या. त्यानंतरच प्रवास सुरू केल्यास इंजिन अधिक सुरळीत काम करते.
\Picture Credit: Pinterest
कंपनीने दिलेल्या वेळापत्रकानुसार पहिली सर्व्हिस करून घ्या. इंजिन ऑइल, फिल्टर आणि इतर महत्त्वाचे भाग तपासले जातात.
Picture Credit: Pinterest
Break-in Period दरम्यान बाईकवर अनावश्यक वजन किंवा दोनपेक्षा जास्त प्रवासी घेऊन लांब प्रवास करणे टाळा.
Picture Credit: Pinterest
प्रत्येक बाईकच्या Break-in सूचना वेगळ्या असू शकतात. त्यामुळे कंपनीच्या ओनर मॅन्युअलमधील मार्गदर्शक सूचना नक्की पाळा.
Picture Credit: Pinterest