एका भांड्यात रवा आणि दही एकत्र करून चांगले मिसळा. त्यात थोडे थोडे पाणी घालून मध्यम घट्टसर पीठ तयार करा.
Picture Credit: Pinterest
हे मिश्रण १०–१५ मिनिटे झाकून ठेवा, जेणेकरून रवा फुगेल आणि मऊ होईल.
Picture Credit: Pinterest
आता त्यात मीठ, साखर आणि लिंबाचा रस घालून पुन्हा हलक्या हाताने मिसळा.
Picture Credit: Pinterest
कुकर किंवा स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवा. ढोकळ्याचे भांडे तेल लावून तयार ठेवा.
Picture Credit: Pinterest
वाफेवर ठेवण्याच्या अगोदर मिश्रणात इनो घाला आणि हलक्या हाताने एकाच दिशेने मिसळा. मिश्रण लगेच फुललेले दिसेल.
Picture Credit: Pinterest
हे मिश्रण तेल लावलेल्या भांड्यात ओता आणि १५–२० मिनिटे वाफेवर शिजवा. सुरी टोचून पाहा, स्वच्छ बाहेर आली तर ढोकळा तयार आहे.
Picture Credit: Pinterest
एका पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून फोडणी करा आणि ढोकळ्यावर टाका.
Picture Credit: Pinterest