घरच्या घरी बनवा बाजारासारखी खमंग मेथी मठरी

Life style

25 february 2026

Author:  नुपूर भगत

एका मोठ्या भांड्यात मैदा, रवा, मेथी, अजवाइन, तिखट, हळद आणि मीठ घालून छान एकत्र करा.

पीठ तयार करणे

Picture Credit: Pinterest

गरम तेल मिश्रणात घालून हाताने चोळा. त्यामुळे मठरी अधिक खुसखुशीत होते.

मोहन घालणे

Picture Credit: Pinterest

थोडे थोडे पाणी घालत घट्टसर कणिक मळा. कणिक जास्त मऊ ठेवू नका.

कणिक मळणे

Picture Credit: Pinterest

कणिक 15–20 मिनिटे झाकून ठेवा, जेणेकरून मेथीची चव नीट मुरेल.

कणिक मुरू देणे

Picture Credit: Pinterest

कणकेचे छोटे गोळे करून लाटून घ्या आणि काट्याने हलके छिद्र पाडा, म्हणजे तळताना फुगणार नाही.

मठरी आकार देणे

Picture Credit: Pinterest

कढईत मध्यम आचेवर तेल गरम करून मठऱ्या मंद आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.

 तळणे

Picture Credit: Pinterest

तळलेल्या मठऱ्या टिश्यू पेपरवर काढून अतिरिक्त तेल काढा आणि पूर्ण थंड झाल्यावर एअरटाइट डब्यात साठवा.

डब्यात साठवा 

Picture Credit: Pinterest