Written By: Dipali Naphade
Source: iStock
केळं खाणं आरोग्यासाठी उत्तम ठरते. पण डायबिटीसचे रूग्ण केळं खाऊ शकतात की नाही हे आपण जाणून घेऊया
डाएटिशन आणि न्यूट्रिशियन दिव्या गांधीनुसार, डायबिटीस रूग्णांनी पिकलेलं केळं सहसा खाऊ नये
हलकेसे कच्चे असणारे केळ्याचे सेवन डायबिटीसच्या रूग्णांनी करावे. यामुळे अधिक पोषण मिळते आणि फायदेशीर ठरते
केळ्यात अत्यंत उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असते आणि याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते
ग्लायसेमिक इंडेक्स पिकलेल्या केळ्यामुळे कमी होते त्यामुळे कच्चे केळे खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात
पिकलेल्या केळ्याच्या सेवनामुळे स्टार्चचे रूपांतर साखरेत होते आणि नैसर्गिक साखर शरीरात वाढते, त्यामुळे सेवन टाळावे
केळ्यात फायबर, विटामिन्स असल्याने मर्यादेत पिकलेल्या केळ्याचे सेवन करणे अधिक चांगले ठरू शकते
केळ्याचे सेवन हे नेहमीच प्रमाणात करावे अन्यथा त्याचा त्रास होऊन शरीरावर परिणाम होऊ शकतो
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वागा, आम्ही कोणताही दावा करत नाही