Monsoon Alert! E20 पेट्रोल वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती

Automobile

03 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

E20 पेट्रोल म्हणजे काय?

E20 मध्ये 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल असते. इथेनॉल पर्यावरणपूरक असले तरी त्याचे काही वेगळे गुणधर्म आहेत.

Picture Credit: Pinterest

ओलावा शोषण्याची क्षमता

इथेनॉल हवेतला ओलावा (Moisture) अधिक सहज शोषू शकते. पावसाळ्यात वाहन दीर्घकाळ उभे असल्यास इंधनात पाण्याचे प्रमाण वाढण्याचा धोका असू शकतो.

Picture Credit: Pinterest

कार बराच काळ पार्क असेल तर...

पावसाळ्यात अनेकजण कार कमी वापरतात. अशावेळी टाकीत जुने E20 इंधन दीर्घकाळ राहिल्यास त्याची गुणवत्ता कमी होऊ शकते.

Picture Credit: Pinterest

जुन्या किंवा E20-सुसंगत नसलेल्या कारमध्ये रबर सील, होज आणि काही धातूच्या भागांवर दीर्घकाळात परिणाम होऊ शकतो. नवीन E20-Compatible कारमध्ये ही समस्या सहसा नसते.

फ्युएल सिस्टिमची काळजी घ्या

Picture Credit: Pinterest

– टाकी शक्यतो अर्ध्यापेक्षा जास्त भरलेली ठेवा. – कार नियमित चालवा. – फ्युएल फिल्टर आणि सर्व्हिस वेळेवर करा.

पावसाळ्यात काय कराल?

Picture Credit: Pinterest

2023 पूर्वीच्या काही कार E20-Compatible नसू शकतात. तुमच्या कारच्या Owner's Manual मध्ये E20 Compatibility नक्की तपासा.

कोणी काळजी घ्यावी?

Picture Credit: Pinterest

पावसाळ्यात E20 पेट्रोल स्वतःहून कार खराब करत नाही. पण दीर्घकाळ वाहन न वापरणे, ओलावा आणि योग्य देखभाल न केल्यास इंधन व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. 

निष्कर्ष

Picture Credit: Pinterest

Adventure Ridersची पसंती;  Honda Transalp XL750 मध्ये काय आहे खास?