रोजच्या आहारातील पदार्थ देखील ॲसिडीटीचा त्रास वाढवू शकतात. त्यामुळे आहरात योग्य पदार्थांची निवड करावी.
Picture Credit: Pinterest
आरोग्य तज्ञांच्या मते, भाताच्या तुलनेत चपातीचे सेवन ॲसिडीटीची समस्या अधिक वाढवते.
Picture Credit: Pinterest
गव्हाच्या पिठात फायबर आणि कॉम्प्लेक्स ग्लूटेन प्रोटीनचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे ते पचायला वेळ लागतो आणि पोटात ॲसिडीटी होऊ लागते.
Picture Credit: Pinterest
भातामध्ये फायबरचे प्रमाण कमी असते ज्यामुळे ते लवकर पचते आणि पोटासाठी हलके ठरते.
Picture Credit: Pinterest
तज्ज्ञ एकाच वेळी भात आणि चपाती एकत्र खाणे टाळण्याचा सल्ला देतात, कारण यामुळे कॅलरी आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण वाढून पचनावर ताण येऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
जर तुम्हाला जास्त फायबरयुक्त पदार्थ खाण्याची सवय नसेल तर यामुळे पोटात गॅस जमा होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
जळलेल्या किंवा करपलेल्या चपात्या खाणे टाळा, अशा चपात्या पटकन पचवता येत नाहीत.
Picture Credit: Pinterest