एका भांड्यात बेसन, हळद, लाल तिखट आणि मीठ घ्या. त्यात थोडे-थोडे पाणी घालून गुठळ्या नसलेले मध्यम घट्ट पीठ तयार करा.
Picture Credit: Pinterest
दुसऱ्या भांड्यात किसलेले पनीर, कांदा, ढोबळी मिरची, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ एकत्र करून सारण तयार करा.
Picture Credit: Pinterest
तवा गरम करून त्यावर हलके तेल लावा. तयार बेसनाचे पीठ डावाने तव्यावर घालून गोलाकार पसरवा.
Picture Credit: Pinterest
चिल्ल्याचा खालचा भाग शिजू लागल्यावर त्यावर तयार केलेले पनीर-भाज्यांचे सारण समान पसरवा.
Picture Credit: Pinterest
सारणावर थोडे बेसनाचे पीठ हलकेच घाला किंवा चिल्ला अर्धा दुमडून झाकून घ्या.
Picture Credit: Pinterest
दोन्ही बाजूंनी थोडे तेल सोडून मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
Picture Credit: Pinterest
गरमागरम स्टफ्ड बेसन चिल्ला प्लेटमध्ये काढा आणि हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest