सर्वप्रथम सुकामेवा (काजू, बदाम, मनुका, टूटी-फ्रुटी) बारीक चिरून घ्या. गरम पाण्यात किंवा संत्र्याच्या ज्यूसमध्ये 30 मिनिटे भिजत ठेवा.
Picture Credit: Pinterest
एका पातेल्यात साखर घालून ती मंद आचेवर वितळवा. साखर गडद ब्राउन रंगाची झाली की त्यात थोडे गरम पाणी घालून कॅरामेल तयार करा.
Picture Credit: Pinterest
एका भांड्यात मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, दालचिनी पूड, जायफळ पूड आणि मीठ चाळून घ्या.
Picture Credit: Pinterest
दुसऱ्या भांड्यात लोणी (बटर) आणि कंडेन्स्ड मिल्क किंवा साखर फेटून घ्या. त्यात कॅरामेल सिरप आणि व्हॅनिला इसेन्स घाला.
Picture Credit: Pinterest
आता कोरडे साहित्य आणि भिजवलेला सुकामेवा हळूहळू मिश्रणात घाला. गरजेनुसार दूध घालून स्मूथ बॅटर तयार करा.
Picture Credit: Pinterest
केक टिनला बटर लावून त्यात बॅटर ओता. प्रीहिट ओव्हनमध्ये 170°C तापमानावर 40–45 अथवा कुकरमध्ये मीठ घालून 45 मिनिटे शिजवा.
Picture Credit: Pinterest
टूथपिक घालून चेक करा. केक थंड झाल्यावर टिनमधून काढा आणि स्लाइस करून सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest