पौष्टिक, खमंग आणि चवीने भरपूर रेसिपी

Life style

23 January 2026

Author:  नुपूर भगत

एका मोठ्या भांड्यात किसलेले बीट, ज्वारीचे पीठ, बाजरीचे पीठ आणि बेसन घ्या.

पीठ घ्या

Picture Credit: Pinterest

त्यात कांदा, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, जिरे, हळद, लाल तिखट आणि मीठ घालून चांगले मिसळा.

मसाले घाला

Picture Credit: Pinterest

थोडं-थोडं पाणी घालून मऊसर, हाताला न चिकटणारं पीठ मळून घ्या.

पीठ मळा 

Picture Credit: Pinterest

तव्यावर तेल गरम करा. हात ओले करून पीठाचा गोळा तव्यावर थापून मध्यम जाडीचं थालीपीठ बनवा.

थालीपीठ थापा 

Picture Credit: Pinterest

थालीपीठाच्या मध्यभागी छोटे छिद्र पाडून त्यात थोडं तेल सोडा.

तेल सोडा

Picture Credit: Pinterest

मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस आणि सोनेरी होईपर्यंत भाजा.

थालीपीठ भाजा 

Picture Credit: Pinterest

गरमागरम बीट थालीपीठ लोणी, दही किंवा ठेच्यासोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest