दिवसभर थकवा जाणवतो? दुर्लक्ष करू नका ही लक्षणं

Life style

14 May 2026

Author:  नुपूर भगत

दररोज पुरेशी आणि शांत झोप न मिळाल्यास शरीर पूर्णपणे रिचार्ज होत नाही. त्यामुळे दिवसभर थकवा जाणवू शकतो.

झोपेची कमतरता

Picture Credit: Pinterest

आयर्नची कमतरता किंवा ॲनिमियामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे कमजोरी आणि सतत थकवा जाणवतो.

शरीरात रक्ताची कमतरता

Picture Credit: Pinterest

अति विचार, चिंता किंवा मानसिक ताण यामुळे मेंदू आणि शरीर दोन्ही थकतात. याचा परिणाम एनर्जी लेव्हलवर होतो.

ताण आणि मानसिक दबाव

Picture Credit: Pinterest

वेळेवर न खाणं, जंक फूडचं जास्त सेवन किंवा पोषणाची कमतरता यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत नाही.

चुकीच्या आहाराच्या सवयी

Picture Credit: Pinterest

शरीर डिहायड्रेट झाल्यास थकवा, डोकेदुखी आणि अशक्तपणा जाणवू शकतो. पुरेसं पाणी पिणं खूप गरजेचं आहे.

पाण्याची कमतरता

Picture Credit: Pinterest

थायरॉईड, डायबिटीज किंवा इतर काही आजारांमुळेही सतत थकवा जाणवू शकतो. अशी लक्षणं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

थायरॉईडसारख्या समस्या

Picture Credit: Pinterest

व्यायाम न करणं किंवा सतत बसून काम करणं यामुळे शरीर सुस्त होतं आणि थकवा वाढू शकतो.

शारीरिक हालचालींचा अभाव

Picture Credit: Pinterest