हिरव्या मुगापासून बनवा झटपट आणि हेल्दी ढोकळा

Life style

14 May 2026

Author:  नुपूर भगत

हिरवा मूग स्वच्छ धुऊन 6-7 तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर त्यातील अतिरिक्त पाणी काढून टाका.

हिरवे मग भिजवा

Picture Credit: Pinterest

मिक्सरमध्ये भिजवलेला मूग, हिरव्या मिरच्या, आलं आणि दही मिक्सरमध्ये गुळगुळीत मिश्रण तयार करा.

मिक्सरमध्ये वाटा

Picture Credit: Pinterest

ढोकळ्याचं भांडं तेल लावून तयार ठेवा. वाफवण्यासाठी कुकर किंवा स्टीमर गरम करायला ठेवा.

भांड्याला तेल लावा

Picture Credit: Pinterest

मिश्रणात शेवटी इनो घालून हलक्या हाताने मिसळा. लगेच तयार भांड्यात मिश्रण ओता.

इनो घाला

Picture Credit: Pinterest

स्टीमरमध्ये 15-20 मिनिटे मध्यम आचेवर ढोकळा वाफवून घ्या. सुरी स्वच्छ बाहेर आली तर ढोकळा तयार झाला आहे.

ढोकळा वाफवा 

Picture Credit: Pinterest

एका पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी, तीळ आणि कढीपत्ता घालून फोडणी तयार करा. ही फोडणी ढोकळ्यावर घालून तुकडे करून सर्व्ह करा.. 

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest