www.navarashtra.com

Published  Jan 0३,  2025

By  Dipali Naphade

जुन्यातील जुनी बद्धकोष्ठता एनिमाने होईल दूर, कसा कराल उपाय

Pic Credit- iStock

रेक्टम अर्थात मलायशयातून पाणी वा पातळ पदार्थ वा गॅस सोडण्याची प्रक्रिया म्हणजे एनिमा, यामुळे आतडे स्वच्छ होऊन घाण साफ होते

एनिमा

एनिमा ही प्रक्रिया डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच होते. आयुर्वेदात वात दोष दूर करण्यासाठी बस्ती कर्म स्वरूपात वापरले जाते

आयुर्वेद

आतड्यांमध्ये जेव्हा शौच अडकते आणि पोट साफ होत नाही तेव्हा शरीरात असंतुलन निर्माण होते, यामुळे आरोग्य बिघडू शकते

आरोग्य

बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी एनिमा हा अत्यंत प्रभावी आणि उत्तम उपाय मानला जातो

बद्धकोष्ठता

एनिमा लावण्याची पद्धत अत्यंत सोपी असून काळजी घेणे गरजेचे आहे. एनिमा बॅग्ज वा सिरींज आणि हलके कोमट पाणी घ्या

डॉक्टर

सर्वात पहिले आरामात झोपा त्यानंतर एका बाजूला पडून वा गुडघ्यावर वाकून आरामात ही प्रक्रिया करा

कसे लावावे

तुम्ही यासाठी बाथरूम वा आरामदायी स्थान शोधा. एनिमा बॅग पाण्याने भरून हवा न जाता ट्यूब रेक्टममध्ये घाला

कुठे

.

ट्यूब व्यवस्थित बंद करा आणि हळू हळू रेक्टमध्ये साधारण 4-5 इंच आत घाला

कसे वापरावे

.

आतील पातळ पदार्थ अत्यंत हळूहळू जायला हवा, यामध्ये कोणतीही घाई करणे चुकीचे ठरू शकते

काळजी

.

पाणी पूर्ण आत गेल्यावर काही वेळ थांबा आणि मग 10 मिनिट्स फिरा, त्यानंतर बाथरूममध्ये जाऊन शौच बाहेर काढा

फिरा

.

एनिमाचा उपयोग करण्यापूर्वी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या आणि मगच वापर करावा

टीप

.