कढईमध्ये थोडे तेल गरम करून त्यात कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि आले-लसूण पेस्ट परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
आता त्यात किसलेले चिकन, हळद, गरम मसाला, मिरी पावडर आणि मीठ घाला. सर्व मिश्रण चांगले परतून त्यातील अतिरिक्त ओलावा आटू द्या.
Picture Credit: Pinterest
गॅस बंद करून मिश्रण थोडे थंड होऊ द्या. त्यानंतर त्यात मॅश केलेले बटाटे आणि कोथिंबीर घालून सर्व साहित्य एकजीव करा.
Picture Credit: Pinterest
तयार मिश्रणाचे लिंबाएवढे गोळे करून त्यांना कटलेटचा अंडाकृती किंवा गोल आकार द्या.
Picture Credit: Pinterest
एका बाऊलमध्ये अंडी फेटून घ्या. प्रत्येक कटलेट आधी अंड्यात बुडवा आणि नंतर ब्रेडक्रम्ब्समध्ये घोळवा.
Picture Credit: Pinterest
कढईमध्ये तेल गरम करून मध्यम आचेवर कटलेट दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
Picture Credit: Pinterest
गरमागरम केरळ स्टाईल चिकन कटलेट टोमॅटो सॉस, मिंट चटणी किंवा चहासोबत सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest