तव्यावर थोडे बटर गरम करून पनीरचे तुकडे हलके सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. नंतर बाजूला काढून ठेवा.
Picture Credit: Pinterest
त्याच तव्यावर पुन्हा थोडे बटर घालून आले-लसूण पेस्ट परता. सुगंध येईपर्यंत हलवत राहा.
Picture Credit: Pinterest
आता चिरलेला कांदा घालून तो गुलाबी होईपर्यंत परता. त्यानंतर ढोबळी मिरची आणि मटार घालून 2-3 मिनिटे शिजवा.
Picture Credit: Pinterest
टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत परता. मग हळद, लाल तिखट, पावभाजी मसाला, गरम मसाला आणि मीठ घालून नीट हलवा.
Picture Credit: Pinterest
परतलेले पनीर मसाल्यात घालून हलक्या हाताने मिक्स करा, जेणेकरून पनीर तुटणार नाही.
Picture Credit: Pinterest
शिजवलेला भात घालून सर्व मिश्रण हलक्या हाताने एकत्र करा. 2-3 मिनिटे मंद आचेवर झाकण ठेवून वाफ येऊ द्या.
Picture Credit: Pinterest
गॅस बंद करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. गरमागरम पनीर तवा पुलाव रायता किंवा सलाडसोबत सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest