Published August 24, 2024
By Shweta Chavan
रेल्वे प्रवासादरम्यान तुम्ही विविध रंगाचे रेल्वेचे डब्बे पाहिले असतील. या रंगीत डब्ब्यांनी तुमचे लक्ष वेधले असेल.
ट्रेनचा स्पीड काय असेल हे या रंगावरुन कळते. लाल रंगाचा कोच हा शताब्दी आणि राजधानी या ट्रेनला असतो.
.
शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेसला लाल रंगाचा कोच लावण्यात येतो. हे डब्बे अॅल्युमिनियमचे असल्यामुळे वजनाने हलके असतात.
.
हाय स्पीड ट्रेनेला हे डब्बे जोडण्यात येतात. हे कोच 160 ते 200 किमी प्रती तासाने धावते
भारतीय रेल्वेत सर्वाधिक निळे डब्बे दिसून येतात. या डब्ब्यांना इंटिग्रल कोच असे म्हणतात
हे लोखंडाने बनविण्यात येतात. जास्त वजन असल्याने या रेल्वे केवळ 70 ते 140 किमी प्रति तासाने धावतात
हिरव्या रंगाचा वापर गरीबरथ रेल्वेसाठी करण्यात येतो. रेल्वेत विविधतेसाठी हा रंग वापरतात.
हिरव्या रंगावर अनेक प्रकारचे चित्र काढण्यात येतात. त्यामुळे हे कोच सुंदर आणि मन मोहून टाकतात.