ढाबा स्टाईल Chicken 65 रेसिपी!

Written By: Nupur Bhagat 

Source: Pinterest

चिकन 65 हा एक लोकप्रिय स्टार्टर्सचा प्रकार आहे, याची कुरकुरीत चव सर्वांनाच फार आवडते.

डिश

यासाठी सर्वप्रथम चिकनचे तुकडे धुऊन स्वच्छ करून बाजूला ठेवा.

चिकन धुवा

एका भांड्यात दही, आले-लसूण पेस्ट, तिखट, हळद, मीठ, गरम मसाला, लिंबाचा रस, तांदळाचे पीठ व कॉर्नफ्लोअर आणि चिकनचे तुकडे घालून ३० मिनिटे मॅरिनेट करा.

मॅरीनेट

एका कढईत तेल गरम करा आणि मॅरीनेट केलेले चिकन यात टाका

तेल

मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत चिकनला तळून घ्या. तळून झाल्यावर चिकनचे तुकडे एका प्लेटमध्ये काढा

तळा

वेगळ्या पॅनमध्ये थोडे तेल गरम करून त्यात कढीपत्ता व हिरव्या मिरच्या टाका.

कढीपत्ता

तळलेले चिकन त्या पॅनमध्ये घालून २-३ मिनिटे चांगले परतून घ्या.

परता

गरमागरम चिकन ६५ सजवून सॉस किंवा चटणीसह खाण्यासाठी सर्व्ह करा.

सर्व्ह करा