झटपट घरी बनवा ढाबा स्टाईल तंदुरी नान

Written By: Nupur Bhagat 

Source: Pinterest

हॉटेलमध्ये गेलो की तंदुरी नान हा पदार्थ आवर्जून ऑर्डर केला जातो, चला याची रेसिपी जाणून घेऊया

रेसिपी 

प्रथम यासाठी एका मोठ्या परातीत मैदा, साखर, मीठ, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा एकत्र करा

एकत्र करा

 त्यात दही आणि तेल घालून मिश्रण एकजीव करा. गरज असल्यास थोडं पाणी घालून मऊसर पीठ मळून घ्या.

मळा 

हे पीठ ओल्या कापडाने झाकून २ तास गरम ठिकाणी झाकून ठेवा, जेणेकरून ते फुलून येईल.

झाकून ठेवणे

२ तासानंतर पीठ पुन्हा मळा आणि लहान लहान गोळे करा आणि जाडसर नान लाटून घ्या

 नान लाटा

लोखंडी तवा गरम करून त्यावर नान टाका आणि तवा उलटा करून थेट गॅसच्या फ्लेमवर १०-१५ सेकंद नान भाजून घ्या

भाजून घ्या 

शेकलेला नान गॅसवरून उतरवा, वरून बटर/लोणी लावा आणि गरम गरम सर्व्ह करा

 सर्व्ह करा