Written By: Nupur Bhagat
Source: Pinterest
चणा कोळीवाडा हा ढाबा अथवा हॉटेलमधील एक लोकप्रिय स्टार्टर्सचा पदार्थ आहे
रात्री भिजवलेले चणे प्रेशर कुकरमध्ये १ शिट्टीपर्यंत शिजवा. चणे मऊ नको, फक्त थोडे शिजवलेले, कुरकुरीत हवे
शिजवलेल्या चण्यांना आलं-लसूण पेस्ट, हळद, तिखट, गरम मसाला, आमचूर पावडरआणि मीठ घालून चांगलं मिक्स करा. १० मिनिटं मुरू द्या
एका बोलमध्ये बेसन, तांदळाचं पीठ आणि थोडंसं मीठ मिक्स करा. लागल्यास थोडं पाणी घालून घट्टसर पीठ तयार करा
मसाल्यात मुरवलेले चणे बेसनाच्या मिश्रणात घोळवा, प्रत्येक चणा व्यवस्थित कोटेड झाला पाहिजे
एका खोलगट कढईत तेल गरम करत ठेवा. मध्यम आचेवर गरम झालं पाहिजे
तेल गरम झाल्यावर चणे थोडे थोडे करून सोडा आणि सोनेरी, कुरकुरीत होईपर्यंत तळा
तळलेले चणे टिशूपेपरवर काढा आणि वरून चाट मसाला, कांदा आणि लिंबू घालून गरम गरम सर्व्ह करा!