पाणीपुरी खाल्ल्याने शरीराला मिळतात हे फायदे

Written By: Nupur Bhagat 

Source: Pinterest

पाणीपुरी हे फक्त चविष्ट स्ट्रीट फूड नसून योग्य प्रकारे खाल्ल्यास काही फायदे देखील देऊ शकते.

फायदे

पाणीपुरीच्या पाण्यात जीरे, हिंग, पुदिना व कोथिंबीर असते, जे पचन क्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत.

पाचनास चालना देणे

पाणीपुरी खाल्ल्यानंतर तोंडाला पाणी सुटते, त्यामुळे भूक वाढते. हेसुद्धा पाचन सुधारण्यास मदत करते.

भूक वाढवते

पाणीपुरीतील पुदिन्याचे थंड पाणी शरीराला हायड्रेट ठेवते, विशेषतः उन्हाळ्यात.

हायड्रेशनसाठी फायदेशीर

थोड्या प्रमाणात वापरलेले मसाले (जसे की काळं मीठ, हिंग) शरीरात दाह कमी करतात आणि सूज नियंत्रणात ठेवू शकतात.

 शरीरासाठी चांगले

पाणीपुरी खाणे ही एक सामाजिक कृती आहे, यामुळे मित्रमैत्रिणींमध्ये संवाद वाढतो आणि मानसिक आरोग्य चांगले राहते

सामाजिक संवाद वाढवते

चविष्ट आणि तोंडाला पाणी आणणारे अन्न खाल्ल्याने डोपामिन रिलीज होते ज्यामुळे मूड सुधारतो.

मन प्रसन्न ठेवते