Summer मध्ये ‘या’ रंगाच्या Cars सर्वात जास्त तापतात

Automobile

25 May, 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

उन्हाळ्यात गाडीचा दरवाजा उघडणे म्हणजे भट्टीचा दरवाजा उघडण्यासारखे आहे. कधी कधी तर आत जाणेही अवघड होऊन बसते.

गाडी भट्टीसारखी गरम होणे

Img Source: Pinterest 

तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? की तुमची गाडी इतरांपेक्षा जास्त गरम होण्यामागे तुमच्या गाडीचा रंग हे प्रमुख कारण असू शकते. 

गाडीचा रंग असू शकते कारण

गाडीचा रंग केवळ तिचे सौंदर्य वाढवत नाही, तर गाडीच्या आत किती उष्णता जाणवेल हे देखील ठरवतो.

केबिनचे तापमान रंग ठरवते

गडद रंगाच्या गाड्या

तज्ज्ञांच्या मते, गडद रंगाच्या गाड्या उष्णता आकर्षित करतात. जेव्हा अशा गाड्या प्रखर सूर्यप्रकाशात उभ्या केल्या जातात. तेव्हा त्यांचे बाह्य आवरण सूर्याची उष्णता वेगाने शोषून घेते. 

केबिनचे तापमान वाढवते

ही उष्णता हळूहळू गाडीच्या केबिनमध्ये पोहोचते. ज्यामुळे तापमान लक्षणीयरीत्या वाढते. यामुळेच पांढऱ्या किंवा चंदेरी रंगाच्या गाड्यांपेक्षा काळ्या रंगाच्या गाड्या जास्त गरम वाटतात.

या गाड्या थंड राहतात

फिकट रंग सूर्यप्रकाश जास्त परावर्तित करतात, म्हणजेच ते कमी उष्णता शोषून घेतात. 

एसीवर कमी दाब

यामुळेच फिकट रंगाच्या गाड्यांची केबिन थंड राहते. यामुळे गाडीच्या एसीवरचा ताणही कमी होतो.

योग्य पद्धतीने आणि हलक्या हाताने

Door योग्य पद्धतीने आणि हलक्या हाताने बंद केल्यास Car जास्त काळ चांगल्या स्थितीत राहू शकते.

पेंटचा प्रकार

केवळ रंगच नाही, तर गाडीमध्ये वापरलेल्या पेंटचा प्रकार देखील उष्णता उत्सर्जनावर परिणाम करतो. सर्वसाधारण सॉलिड पेंट्स जास्त उष्णता शोषून घेतात.

मेटॅलिक, पर्ल आणि कँडी

मेटॅलिक, पर्ल आणि कँडी पेंट्समध्ये असे विशेष घटक असतात जे प्रकाश अधिक परावर्तित करतात. ज्यामुळे गाडीच्या पृष्ठभागावरील उष्णता कमी होते.

कोणता रंग उबदार आहे?

कोणत्या रंगाची गाडी किती उष्णता शोषून घेते आणि ती अंदाजे किती गरम होऊ शकते.

पांढरा रंग

पांढरी कार सूर्यप्रकाशापैकी सुमारे ६०% परावर्तित करते आणि सुमारे ४०% उष्णता शोषून घेते. त्यामुळे तिच्या केबिनचे तापमान ४३ ते ४५ अंशांपर्यंत पोहोचू शकते.

चंदेरी रंग

चंदेरी रंगाच्या गाड्या सूर्यप्रकाशाचे अंदाचे ५० ते ६०% परावर्तन करतात. आणि ४० ते ५०% उष्णता शोषून घेतात. गाडीच्या आतील तापमान ४५ ते ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते.

हिरवा

४० ते ५०% प्रकाश परावर्तित करते आणि ६० टक्क्यांपर्यंत उष्णता शोषून घेते.गाडीच्या आतले तापमान सुमारे ४५ अंशांपर्यंत वाढू शकते.

निळा

निळ्या गाड्या सूर्यप्रकाशाचे ३० ते ४० टक्के परावर्तन करतात आणि सुमारे ६० ते ७० टक्के उष्णता शोषून घेतात. आतील तापमान ४८ अंशांपर्यंत पोहोचू शकते.

लाल

लाल रंगाच्या गाडीची बॉडी २० ते ३० टक्के प्रकाश परावर्तित करते आणि ७० ते ८० टक्के उष्णता शोषून घेते. तिच्या केबिनमधील तापमान ५१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते.