रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात अर्धा चमचा हळद मिसळून प्या. हळद दाह कमी करते आणि त्यामुळे खोकला आणि सर्दी लवकर बरा होते.
Picture Credit: Pinterest
आलं किसून त्याचा रस काढा आणि त्यात एक चमचा मध मिसळा. दिवसातून २ वेळा हे मिश्रण घेतल्यास घसा साफ होतो.
Picture Credit: Pinterest
गरम पाण्यात थोडे मीठ किंवा विक्स टाकून वाफ घ्या. वाफेमुळे नाकातील कोंडी कमी होते आणि श्वसनमार्ग मोकळा होतो.
Picture Credit: Pinterest
तुळस ही औषधी वनस्पती आहे. सकाळी २-३ तुळशीची पाने चघळल्याने सर्दी-खोकल्यावर चांगला फायदा होतो.
Picture Credit: Pinterest
कोमट पाण्यात मीठ टाकून दिवसातून २-३ वेळा गुळण्या करा. यामुळे घशातील जंतुसंसर्ग कमी होतो आणि घसा दुखणे थांबते.
Picture Credit: Pinterest
थंड पाणी टाळून गरम किंवा कोमट पाणी प्या. यामुळे कफ पातळ होतो आणि खोकला कमी होण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
पुरेशी झोप घ्या आणि आईस्क्रीम, थंड पेये, दही यांसारखे पदार्थ टाळा. शरीराला विश्रांती मिळाल्यास आजार लवकर बरा होतो.
Picture Credit: Pinterest