Published Oct 12, 2024
By Prajakta Pradhan
Pic Credit - iStock
दसऱ्याच्या दिवशी अपराजिताची पूजा का केली जाते?
यंदा शनिवार 12 ऑक्टोबर रोजी दसरा आहे. या दिवशी भगवान श्रीरामांनी रावणाचा वध केला होता ज्यामुळे अधर्मावर धर्माचा विजय झाला होता.
दसऱ्याच्या दिवशी भगवान श्री राम व्यतिरिक्त अपराजिताची सुद्धा पूजा केली जाते. या दिवशी त्यांची पूजा का केली जाते तुम्हाला माहिती आहे का?
दसऱ्याच्या दिवशी अफराजिता देवीची पूजा केल्याने कठीण कामातही यश मिळते असे म्हटले जाते. आणि शत्रूंवर विजय मिळेल.
.
रावणावर विजय मिळवण्यासाठी रामाने देवी अपराजिताची पूजा केली होती. म्हणून या दिवशी अपराजिता देवीची पूजा केली जाते.
.
दसऱ्याच्या दिवशी विजय मुहूर्तावर पूजेच्या ठिकाणी अपराजिताची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा.
गंगाजलाने अभिषेक करा आणि नंतर ओम अपराजिताय नमः या मंत्राचा जप करून त्याची पूजा करा.
देवी अपराजिताला फूल, तांदूळ, हळदकुंकू, धूप, दिवा, नैवेद्य, गंध अर्पण करा.
अपराजिता देवीची आरती करून पूजेची सांगता करा. देवीच्या कृपेने तुमच्या मनोकामना पूर्ण होतील आणि तुमचे घर सुख-समृद्धीने भरून जाईल.