चिकन प्रेमींसाठी खास स्टफ्ड बाओ रेसिपी

Life style

13 May 2026

Author:  नुपूर भगत

एका भांड्यात कोमट दूध, साखर आणि यीस्ट मिसळून १० मिनिटे बाजूला ठेवा. नंतर त्यात मैदा घालून मऊ पीठ मळा तासभर झाकून ठेवा.

पीठ मळा 

Picture Credit: Pinterest

चिकन छोटे तुकडे करून घ्या. पॅनमध्ये थोडे तेल गरम करून कांदा परतून घ्या.

चिकनचे तुकडे करा 

Picture Credit: Pinterest

आलं-लसूण पेस्ट घालून परता. त्यानंतर चिकन घालून मध्यम आचेवर शिजवा.

आलं-लसूण पेस्ट

Picture Credit: Pinterest

चिकन शिजल्यानंतर त्यात सोया सॉस, चिली सॉस आणि मीठ घालून मिश्रण छान कोरडे होईपर्यंत परता.

सॉसेस घाला

Picture Credit: Pinterest

फुगलेले पीठ पुन्हा मळून छोटे गोळे तयार करा. प्रत्येक गोळ्याची छोटी पुरी लाटून त्यात चिकन स्टफिंग भरा.

पुरी लाटून स्टाफिंग भरा

Picture Credit: Pinterest

स्टाफिंग भरून कडा बंद करा आणि याला गोल बाओचा आकार द्या. 15-20 मिनिटे वाफवून घ्या.

बाओचा आकार द्या

Picture Credit: Pinterest

गरमागरम चिकन बाओ वरून कोथिंबीर घालून चिली सॉसबरोबर सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest