प्रॉन्स स्वच्छ धुवून त्यातील पाणी पूर्ण काढून टाका. त्यावर थोडे मीठ आणि लिंबाचा रस लावून १० मिनिटे बाजूला ठेवा.
Picture Credit: Pinterest
एका मोठ्या भांड्यात दही, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला, बेसन आणि तेल घालून छान मिक्स करा.
Picture Credit: Pinterest
तयार मसाल्यात प्रॉन्स घाला आणि प्रत्येक प्रॉन्सला मसाला व्यवस्थित लागेल असे मिक्स करा. हे मिश्रण ३० मिनिटे मुरण्यासाठी ठेवा.
Picture Credit: Pinterest
आता स्क्यूअर किंवा काडीवर एक प्रॉन्स, एक कांद्याचा तुकडा आणि एक ढोबळी मिरचीचा तुकडा अशा क्रमाने लावा.
Picture Credit: Pinterest
तवा किंवा ओव्हन मध्यम आचेवर गरम करा. त्यावर हलके बटर किंवा तेल लावा.
Picture Credit: Pinterest
तयार प्रॉन्स टिक्का दोन्ही बाजूंनी ८-१० मिनिटे भाजून घ्या. प्रॉन्स हलके सोनेरी आणि स्मोकी दिसू लागले की ते तयार झाले आहेत.
Picture Credit: Pinterest
गरमागरम प्रॉन्स टिक्का पुदिना चटणी, कांदा आणि लिंबाच्या फोडीसोबत सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest