Written By: Nupur Bhagat
Source: Pinterest
उन्हाळ्यात आंब्याचे अनेक पदार्थ बनवले आणि खाल्ले जातात, यातील लोकप्रिय पदार्थ म्हणजे मँगो मिल्कशेक
आंब्याची साल काढून गर वेगळा करा. बियातलं गर सुद्धा चमच्याने काढा
मिक्सरच्या भांड्यात आंब्याचा गर, दूध, साखर आणि बर्फाचे तुकडे घाला
सर्व साहित्य गुळगुळीत होईपर्यंत मिक्सरमध्ये फिरवा. घट्ट किंवा पातळ शेक हवा असल्यास दूध प्रमाणानुसार वाढवा/कमी करा.
तयार शेक चवीनुसार तपासून घ्या – साखर किंवा दूध वाढवायचं असल्यास पुन्हा एकदा मिक्स करा
शेक ग्लासमध्ये ओता. वरून थोडंसं केशर किंवा वेलदोड्याची पूड घालू शकता
थंडगार आंब्याचा मिल्कशेक लगेच सर्व्ह करा. तुम्ही त्यावर ड्रायफ्रूट्स घालून सजवू शकता